Day Special
राजधानीत प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, 17 : केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.