Entertainment
महाराष्ट्र सदनात पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, 25 : पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली