JobsTrending

महाराष्ट्र महसूल विभाग मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत तलाठी (गट - क) संवर्गातील एकूण 4644 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती परीक्षा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याच्या केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

पदाचे नाव – तलाठी (Talathi)
विभाग – महसूल आणि वन विभाग
वेतनश्रेणी – 25500 – 81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण पदे – 4644

Talathi Bharti शैक्षणिक अर्हता :-
उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

आवश्यक सूचना :-
उमेदवारी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज सादर करता येईल.
अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट
https://rfd.maharashtra.gov.in/en वर अर्ज सादर करू शकतात.
विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा :-
अर्ज सादर करण्याची सुरुवात – 26 जून 2023 रोजी पासून
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 17 जुलै 2023 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत

परीक्षा शुल्क (फी) :-
खुला प्रवर्ग करिता १०००/-
राखीव प्रवर्ग करिता ९००/-

अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या Submit and Pay Fees या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुख पृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केलेल्या पदाच्या यादीतील Fees Not Paid अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात / पद/ परीक्षेसामोरील Pay Now या लिंकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.

परीक्षा शुल्काचा भरणा खालील पध्दतीने करता येईल.

१) परीक्षा शुल्काचा भरणा प्रणालीद्ववारे उपलब्ध करुन दिलेल्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.

२) परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कमेची वजावट झाल्यानंतर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरुन आणि / अथवा खात्यातून लॉग आऊट होऊ नये.

३) परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्का भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे, याची स्थिती लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापुर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.

४) परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहीत दिनांक / विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. विहीत मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रियेकरिता विचार केला जाणार नाही.

इतर माहितीसाठी व अर्ज भरण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *