Maharashtra

महाज्योतीच्या १३१ विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी

एकूण ४३९ उमेदवारांनी अर्ज केले होते.

महाज्योतीच्या १३१ विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना केली आहे.

महाज्योती मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.
संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरित अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात आली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महाज्योतीच्या १३१ विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी प्राप्त झाली.

महाज्योतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली होती. त्यात एकूण ४३९ उमेदवारांनी अर्ज केले होते.

त्यापैकी योजनेकरिता पात्र ४३७ विद्यार्थ्यांना एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. त्यात महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या १३१ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाल्याची माहिती आहे.

त्यातील ६८ विद्यार्थी हे इतर मागासवर्ग, ११ विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती- ब वर्गातील ११ विद्यार्थी, भटक्या जमाती क मधील १८ तर भटक्या जमाती- ड मधील २० विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *