समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली शासकिय वसतिगृहाची पाहणी
नियमांची पायमल्ली करत शिल्लक निधीचा खर्च
समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली शासकिय वसतिगृहाची पाहणी
नियमांची पायमल्ली करत शिल्लक निधीचा खर्च
जिल्हाधिकारी यांना चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे सूचना
धाराशिव :- सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तुळजापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकिय वसतिगृहाची पाहणी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केली.

१०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेल्या या वसतिगृहातील फर्निचर अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. सदर भेटीदरम्यान वस्तीगृह इमारती मध्ये नियमांची पायमल्ली करत पेव्हर ब्लॉक चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी भोजन कक्षात उपलब्ध केलेले डायनिंग टेबल ऐवजी स्टडी टेबल बसवण्यात आलेले आहेत. तसेच इमारतीसाठी मंजूर निधी मधील शिल्लक रकमेमधून कोणती इतर कामे घेता येतील याबाबत संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असतांना, परवानगी न घेताच निधी खर्च करण्यात आली.

त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित करुन जिल्हाधिकारी यांना चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे सूचना यावेळी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या. प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, विभागाचे सहायक आयुक्त बी. जी. अरवत यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ येऊ देवू नका – डॉ. प्रशांत नारनवरे
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने एकही विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्तडॉ. प्रशांत नारनवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.