Mumbai

मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे टप्प्या टप्प्याने काँक्रीटीकरण करणार अशी माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले कीमुंबई शहरातील रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. हा त्रास कमी व्हावा यासाठी शहरातील रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकतीच मुंबई महापालिकेचे आयुक्तविविध अधिकारी आणि तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुंबईतील रस्ते काँक्रीटचे करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया आणि कार्यवाही पूर्ण केली जात आहे. हे काम विहीत काळात पूर्ण केले जाईल याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

            मुंबई शहरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाचा विशेष पायाभूत सुविधा प्रकल्पात समावेश केला जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले. या रस्त्यावरील काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. तिथे व्यावसायिक उपक्रम चालवले जातात. त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील. त्याचबरोबर याबाबत तेथील स्थानिक लोकप्रतिनिधीअधिकारी आणि तज्ज्ञ व्यक्ती यांची एक समितीही नियुक्त करण्याबाबत विचार केला जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा संकुलपर्यंतचा रस्ता प्रकल्पाची लांबी ५.२ किलोमीटर आहे, पैकी मागाठाणे ते सिध्दार्थ नगर दरम्यान भूसंपादन कार्यवाही सुरू आहे. सिध्दार्थ नगर ते लोखंडवाला संकुल दरम्यानच्या सिध्दार्थ नगर ते एसीपी कार्यालयापर्यंतचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. पुढील भागात झोपडपट्टी आहे. सदरच्या झोपडपट्टी धारकांची त्याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे. त्यामुळे निष्कासन कारवाई प्रलंबित आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी एकत्रित चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईलअसे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            यावरील चर्चेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सवश्री सुनील प्रभूपराग अळवणी यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *