Mumbai

महानंद’वर प्रशासक नेमण्यात येईल–दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ ( महानंद) ही संस्था सहकार क्षेत्रातील दुग्धव्यवसायातील शिखर संस्था आहे. या संस्थेची आर्थिक घडी बसविण्यासाठी या संस्थेवर प्रशासक नेमण्यात येईलअसे दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधापरिषदेत सांगितले.

            सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी ‘महानंद’ संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. विखे पाटील बोलत होते. बाजारपेठेत खासगी दूध संस्थांचा वाढता प्रभाव आहे. तसेच सदस्य संघाकडून त्यांच्या एकूण संकलनाच्या 5 टक्के दूध पुरवठा महासंघास करण्यात येत नाही.  महासंघास दैनंदिन दूध खरेदी व प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी अधिकर्ष ( over draft) घ्यावा लागत आहे. महानंदची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संस्थेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

            लवकरच राज्यातील सर्व दूध महासंघाची बैठक घेण्यात येईल. यात ‘महानंद’ला पुनरुज्जीवित कसे करता येईल याविषयीच्या सूचना घेण्यात येतीलअसे पाटील यांनी सांगितले.

            लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकरशशिकांत शिंदेगोपीचंद पडळकरसतेज पाटीलभाई जगतापअमरनाथ राजूरकरमहादेव जानकर यांनी भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *