Mumbai

महामार्गावरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याला दिली भेट गणेशोत्सव आणि सुट्यांच्या काळातील कोंडी टाळण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश

मुंबई, दि.29: सण-उत्सव,सुट्ट्यांच्या काळात मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी(Traffic congestion) आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम  करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीची(Traffic congestion) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. आज साताऱ्याहून मुंबईकडे परतत असताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून  तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
प्रवासादरम्यान त्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. याभागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा(Traffic congestion)  मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला.  यावेळी त्यांनी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या काळात याठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन  त्याचबरोबर टोल वसूल करण्यासाठी आवश्यक ते स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी. अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याकरिता तातडीने उपाययोजना हाती घेवून वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणेने जलदगतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *