Mumbai

दि.08 सप्टेंबर 2022 दुचाकीसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध

नवी मुंबई दि.08 :- पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये खासगी चारचाकी मोटार वाहनांच्या नवीन नोंदणीसाठी MH46 CG ही नवीन मालिका लवकरच सुरु होत असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी कळविले आहे.

 या मालिकेतील आकर्षक/अनाकर्षक नोंदणी क्रमांक राखीव करायचे असल्यास नागरिकांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत पनवेलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 57अ नुसार विहित केलेले आकर्षक नोंदणी क्रमांक व त्यासाठीचे शुल्क याबाबतची सविस्तर माहिती, पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास उक्त नमूद तरतूदीनुसार नोंदणी क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल, याची नोंद घेण्यात यावी. असे पनवेलचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी पनवेल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उरण, पनवेल, कर्जत व खालापूर तालुक्यातील नागरिकांना एका प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *