Mumbai
पाणी पुरवठा कामातील गैरव्यवहाराची चौकशी-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

बीड जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यातील गैरप्रकाराप्रमाणे राज्यातील इतर काही ठिकाणी अशा प्रकारे गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतही चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
याबाबतच्या चर्चेत सदस्य सर्वश्री धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, अभिमन्यू पवार यांनी सहभाग घेतला.