Mumbai

दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची मुलाखत

 मुंबईदि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठाग्राहक संरक्षण तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर शुक्रवारदि. 21 व शनिवारदि. 22 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

            राज्यातील गोरगरिब जनतेला दिवाळी आनंदात साजरी करता यावीयासाठी शासनाच्या वतीने दिवाळी सणानिमित्त 100 रुपयात शिधा जिन्नस आनंदाचा शिधा‘ वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ कशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत प्रगतीपथावर असलेली कामे आणि सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांतील विकासकामेआरोग्य विषयक राबविण्यात येणाऱ्या योजनापर्यटनाच्या दृष्टीने घेण्यात आलेले निर्णय याबाबत सविस्तर माहिती, अन्न व नागरी पुरवठाग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून दिलखुलास कार्यक्रमात जाणून घेतली आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *