Mumbai
12 सप्टेंबर रोजी कोकण विभागीय लोकशाही दिन-कोंकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे

नवी मुंबई,दि.08:- कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयातकोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10.00 ते दु.1.00 पर्यंत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज/निवेदने स्विकारणार आहेत, असे कोंकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी कळविले आहे.