Mumbai

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी मतदानापूर्वी तसेच मतमोजणी दिवशी मुंबई उपनगरात मद्य विक्री नाही-श्रीमती निधी चौधरी

 मुंबई उपनगर, दि. २० : मुंबई उपनगरातील १६६- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया तर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडाव्या, यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी मतदानाच्या ४८ तासापूर्वी ते मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणी दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

            पूर्वेस मिठी नदी -१६८ चांदिवली पासून दक्षिणेस सहर रोड, बाप नाला – १६७, विलेपार्लेपर्यंत तसेच पश्चिमेच्या पश्चिम रेल्वे ट्रॅक -१६८ अंधेरी पश्चिम पासून उत्तरेस जत्वार नगर रोड नंबर ५, जे.व्ही.एल.आर. रोड -१५८ या परिसरातील सर्व मद्य परवाने बंद असतील. हा बंद कालावधी मतदानाच्या ४८ तासांपूर्वी म्हणजेच दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा मतदान संपेपर्यंत असेल. त्याच प्रमाणे, मतमोजणीच्या दिवशी म्हणजे दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण दिवस मद्यविक्री बंद असेल.

            सबब दिनांक १ नोव्हेंबर (सायंकाळी ६ पासून), २ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबर (मतदान संपेपर्यंत) आणि ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी मुंबई उपनगरातील नमूद परिक्षेत्रात मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती चौधरी यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *