NagpurWomen Special

Sant Chokhamela hostel संत चोखामेळा वसतिगृहात ग्रामीण भागातील मुलींची राहण्याची सोय होणार

शहरी भागातील महाविद्यालयांत शिक्षण घेण्यास सोयीचे

समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल होण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. शिक्षणाने माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होतात. फक्त नोकरी मिळवण्यासाठीच शिक्षण असते असे नाही तर व्यक्तीच्या एकूणच व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी, जगण्याला आत्मविश्वास देण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.

sant-chokhamela-hostel

ग्रामीण भागातील गरीब, गरजू मुलींना शहरी भागातील महाविद्यालयांत शिक्षण घेण्यास सोयीचे व्हावे, त्यांच्या राहण्याची सोय व्हावी यासाठी समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या वसतिगृहात मुलींना आता राहण्याची गरज भासणार नाही. सर्व मुली एकाच वसतिगृहात येतील. नागपूर येथील संत चोखामेळा वसतिगृहात (Sant Chokhamela hostel) या मुलींची सोय करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *