Navi Mumbai

“स्वराज्य महोत्सव” उपक्रमांतर्गत कोंकण भवनात समूह राष्ट्रगीत गायन

नवी मुंबई दि. 17:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या “स्वराज्य महोत्सव” (Swarajya Mahotsav) या उपक्रमांतर्गत आज कोकण भवनात उप आयुक्त श्री. मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली “समूह राष्ट्रगीत गायन” करण्यात आले.

            यावेळी उपआयुक्त (महसूल) श्री. मकरंद देशमूख, उपायुक्त (पुरवठा) श्री.रवि पाटील, उपायुक्त (रोहयो) श्रीम.वैशाली राज चव्हाण (निर्धार),  उपायुक्त (करमणूक) श्रीम.सोनाली मुळे, उपआयुक्त (वस्तू व सेवा कर) श्री. कमलेश नागरे, कोंकण विभाग नगररचनाचे सहसंचालक श्री.जितेंद्र भोपळे, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

            भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर ‘आजादी का अमृत महोत्सव’ (Swarajya Mahotsav)अर्थात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होतो आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण राज्यात “स्वराज्य महोत्सव” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृमिक कार्य विभागाने   दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या शासन निर्णयानूसार दि. 17 ऑगस्ट रोजी “स्वराज्य महोत्सव” या उपक्रमांतर्गत दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वा. एकाच वेळी राज्यात सर्वत्र “समूह राष्ट्रगीत गायन” करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.  या शासन निर्णयात दिलेल्या सूचनेनूसार कोंकण भवन इमारतीत असलेल्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज कोकण भवन इमारतीच्या प्रांगणातील ध्वजस्तंभाजवळ मोठया संख्येने उपस्थित राहून समूह राष्ट्रगीत गायन केले.

            समूह राष्ट्रगीत गायना नंतर ‘वंदेमातरम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे कोकणभवन इमारतीचा परिसर देशभक्तीमय झाला. यावेळी दि. 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या शासन निर्णयात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *