Palghar

अनुसूचित जाती(SC)व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी 90 % अनुदान

पालघर दि. 30 : अनुसूचित जाती (SC) व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर कल्टिव्हेटर किवा रोटॅव्हेटर व ट्रेलर खरेदी करण्यासाठी DBT (Direct Benefit Transfer) तत्वावर 90 % अनुदान (कमाल रक्कम रू.3.15 लाख च्या मर्यादित) देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत राबविली जात आहे. सदर या योजनेचा लाभ घेण्याकरिता पालघर जिल्ह्यातील अनुसुचित जाती(SC) व नवबौध्द घटकातील बचत गटांनी आपले प्रस्ताव / अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, पालघर यांचे कार्यालयात सादर करावेत. या योजनेच्या संबंधी अधिक माहिती करिता  जिल्हा मुख्यालय, प्रशासकीय इमारत- अ तळ मजला रूम नं. 001, पालघर बोईसर रोड कोळगांव ता. जि. पालघर येथील कार्यालयाशी व दूरध्वनी क्रमांक 02525-254277 नंबरवर संपर्क साधून जास्तीत जास्त बचत गटातील लाभर्थ्यानी या योजनेचालाभ घ्यावा. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण,  यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *