Palghar

नारी शक्ती पुरस्करासाठी अर्ज सादर करावे-जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

पालघर दि. 08 : दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य केंद्र शासनाकडुन ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे. अशा महिला व संस्थांच्या सन्मानार्थ नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. महिला सक्षमीकरण्यासाठी उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे. अशा महिला, संस्था व टमा सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत 8 मार्च जागतिक महिला दिनांचे औचित्य साधून “नारी शक्ती पुरस्कार” देण्यात येतो.

विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग महिलांचे पुनवर्सन अशा कार्यात ज्या महिलांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले आहेत अशा महिला, संस्था व गटांना तसेच शैक्षणिक, प्रशिक्षण कार्य, पर्यावरण क्षेत्र, महिला स्वावलंबन आणि शेती व्यवसाय काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांचे श्रम जाणीवपुर्वक कमी करण्यासाठी प्रयत्न केले अशा महिला तसेच संस्था व गट त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्न केले अशा महिला, संस्था व गट यांनी अर्ज करावेत.

नारी शक्ती पुरस्कारासाठी वैयक्तिक अर्ज करणाऱ्या महिलेचे वय दि. 01 जुलै 2021 रोजी 25 पुर्ण असावे. त्याचबरोबर पुरस्कारासाठी संस्थात्मक अर्ज करणान्या संस्था संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्ष कार्यरत असावी.

शासन पत्रात नमूद मार्गदर्शक सुचनानुसार नारी शक्ती पुरस्कारसाठी अर्जदाराने अर्ज, नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाइनव्दारे केंद शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर भरावयाचे आहे. केवळ ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील तसेच अर्ज, नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2022 आहे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *