फीट इंडीया मोहीमेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पेर्धेसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे

पालघर दि. 09 : फीट इंडीया मोहीम सन 2019 पासून संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळ शारिरिक तंदरुस्ती याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय खेळ प्राधीकरण, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय यांचे मार्फत फीट इंडीया मोहीमेंतर्गत राष्ट्रीयस्तरावर प्रश्नमंजुषा (QUIZ CONTEST) आयोजित करण्यात आली आहे. जवळपास रु. 3 कोटी 25 लाख रक्कमेची ही प्रश्नमंजुषा (QUIZ CONTEST) स्पर्धा स्टार स्पोर्टस वाहीनीवर थेट प्रक्षेपीत होणार आहे.
प्रश्नमंजुषा (QUIZ CONTEST) स्पर्धांचे ऑनलाईन नोंदणी दि. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. अधिक माहीतीसाठी https://fitindia.nta.ac.in या साईटवर जाऊन माहीती प्राप्त करुन घ्यावी. सदर मोहीमेसाठी भारतीय खेळ प्राधीकरण यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाणार असून सदर बाबतीत भारतीय खेळ प्राधीकरणाचे सहाय्यक संचालक सचिन घायाळ, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.