Palghar

इतर मागस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी “शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज सादर करावे”

पालघर दि. 27 : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. पालघर या महामंडळामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षात इतर मागस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी “ शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे.

योजनेचे नांव : शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

योजनेचा उद्देश : राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थीना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजुर केलेल्या रु.20.00 लक्षपर्यंत कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा महामंडळाकडुन वितरीत केला जाईल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक, आर्थिकदृष्टया सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

उद्दीष्टे : सर्व जिल्हा कार्यालयांना आवश्यकतेनुसार आर्थिक व भौतिक उद्दीष्ट निर्धारित करण्यात येईल.

योजनेचे स्वरुप : राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.10.00 लक्ष, परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.20.00 लक्ष

लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्ती : अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातील, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रु.8.00 लक्ष पर्यंत असावी, अर्जदार इयत्ता 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असावेत, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60% गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा, केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, बँकेने मंजूर केलेली संपूर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील, राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहील, परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याकरीता फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील, अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0-1 (म्हणजेच यापुर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.

व्याजाचा परतावा : महामंडळ केवळ बँकेकडुन वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त १२% पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना करेल.

कर्ज प्रस्तावा सोबत अपलोड करावयाची कागदपत्रे : अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला. (Domicile), अर्जदार व अर्जदाराचे पालक | यांचे आधार कार्ड (Front & Backside), ज्या अभ्यासक्रमाकरीता शैक्षणिक | कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची | गुणपत्रिका, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, अर्जदाराचा जन्माचा / वयाचा दाखला, शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र,  शिष्यवृत्ती ( Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बँक खाते पुरावा.

अभ्यासक्रम :

राज्यांतर्गत अभ्यासक्रम :- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NAAC मानांकन प्राप्त) शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमासाठी शासनमान्य सामाईक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व त्यानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी –

ब. देशांतर्गत अभ्यासक्रम :- देशातील नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र असतील.

क. परदेशी अभ्यासक्रम (Foreign Education) : १. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रँकिंग / गुणवत्ता, पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE), Test of English as a Foreign Language (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.

कार्यपध्दती : इच्छूक अर्जदाराने महामंडळाच्या वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक राहील, प्राप्त प्रस्तावास जिल्हा लाभार्थी निवड समितीची मान्यता घेवून जिल्हा व्यवस्थापक सदर प्रस्ताव मुख्यालयास मंजुरीकरीता सादर करतील, अर्ज मुख्यालय स्तरावर तपासणी करून ऑनलाईन पात्रता प्रमाणपत्र निर्गमित करेल. सदरचे पात्रता प्रमाणपत्र फक्त 6 महिने कालावधीकरिता वैद्य राहील, महामंडळाने निर्गमित केलेले पात्रता प्रमाणपत्र व ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत अर्जदारास स्वतः बँकेकडे सादर करावे लागेल, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागेल, शैक्षणिक कर्जाची दरमहा नियमित परतफेड आवश्यक आहे, व्याज परतावा मागणीसाठी अर्जदाराने दरमहा बँक कर्ज खाते उतारा संगणक प्रणालीवर, वेबपोर्टलवर अपलोड करणे आवश्यक राहील, अर्जदाराने थकीत रक्कमेचा भरणा केल्यास अर्जदारास लगतच्या परतफेड केलेल्या व्याजाच्या हप्त्याचा परतावा देय राहील.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी : शिक्षण पुर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रक्कमेचा परतावा (कमाल 12% पर्यंत) महामंडळ अर्जदाराच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करेल, व्याज परतावासाठी जास्तीत जास्त ५ वर्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

योजनेच्या माहितीसाठी जिल्हा कार्यालय – शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, मर्या. पत्ता: आफ्रीन अपार्टमेंट, “बी” विंग, फ्लॉट नं. १०६, पहिला मजला, नवली रेल्वे फाटक रोड, नवली, पालघर (पू.) मो. 8879945080/9158110297 इमेल: dmobcpalghar@gmail.com.

तसेच ऑनलाईन कर्ज अर्ज दाखल करण्यासाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन महामंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *