Palghar
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रगीताचे समूह गायन

पालघर दि. 17 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवांतर्गत ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’ ही अभिनव संकल्पना राबविण्याचे शासनाव्दारे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी – कर्मचाऱ्यांनी गायन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, संदीप पवार आदि अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विध्यार्थी उपस्थित होते.