भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन

पालघर दि. 27 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी, 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे‘ आयोजन करण्यात येणार आहे. ‘भ्रष्टाचार मुक्त भारत- विकसित भारत’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, कर्मचारी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतल्यानंतर मा.राज्यपाल व मा.मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल.
कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
————+++++++++———-
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर
पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप
मो.नं. 9923346810/ 9850158810
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास
मो.नं. 8007290944/ 9405722011
@ टोल फ्रि क्रं. 1064