महिला लोकशाही दिन १९ सप्टेंबर रोजी

पालघर दि. ०२ : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आला आहे.
महिला लोकशाही दिनाचा अर्ज जिल्हाधिकारी यांना उद्देशून असावा. तसेच तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र. व तहसिलदारांच्या उत्तराची प्रत अर्ज सोबत जोडण्यात यावी. महिला लोकशाही दिनी घ्यावयाची तक्रार, अडचण किमान १५ दिवसाच्या पूर्वी अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कक्ष क्र. १०८, पहिला मजला, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोळगाव रोड, पालघर येथे करावा.
संपर्कासाठी ई-मेल- dwedopalghar@gmail.com फोन नं. ०२५२५-२५७६२२ यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुरव्यासह सादर करावे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पालघर यांनी केले आहे.