आयुक्तांची रात्री बालसुधार केंद्राला अचानक भेट
मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी

पुणे, दिनांक- १४/०७/२०२३ येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राला (Pandit Jawaharlal Nehru Udyog Kendra) महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवार ला रात्री अचानक भेट दिली व बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली.
भेटी दरम्यान मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती आयुक्तांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे यांनी घेतली.
येथे असणाऱ्या २२ विधि संघर्ष ग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद साधत त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात कशा पद्धतीने दिल्या जातात याची चौकशी केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, त्यांची स्वच्छतागृह तपासण्यात आली. ज्या ठिकाणी या मुलांचे जेवण बनवले जाते त्या ठिकाणचीही पाहणी महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधिक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार व इतर कर्मचारी उपस्थित होते.