Pune
पुणे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या कारवाईमुळे ‘त्या’ पालकांनी सोडला सुटकेचा निःश्वास…
दिल्लीहून पळून आलेल्या तिघी अल्पवयीन मुलींची पुणे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली सुटका झाली असून त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दिल्लीतील 13 ते 17 वयोगटातील तीन मुली नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या आणि हॉटेलमध्ये खोली शोधू लागल्या. मात्र त्यांच्यासोबत कोणीही नसल्याने आणि त्या अल्पवयीन असल्याने हॉटेल व्यवस्थापक व रिक्षाचालक यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.पुणे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnaware) यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या मुलींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तसेच नोएडा येथे त्यांच्या पालकांनाही त्या सुखरूप असल्याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना बालसुधारगृहात पाठवले गेले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉक्टर. प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.