Mumbai

आदिवासी भागातील रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल–आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित

आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या मुख्य शहरांशी जोडण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईलअसे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.

 सदस्य प्रताप सरनाईकदौलत दरोडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

 आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले कीआदिवासी पाडेवस्ती यांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकामग्रामीण विकासशालेय शिक्षण आणि वन विभाग या सर्वांत एकत्रित समन्वय साधला जाईलअसेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत सर्व आदिवासी पाडे आणि वस्त्या वाड्या येथे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

 याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवारनाना पटोलेयोगेश सागर आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *