Palghar

विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करावे-सहायक आयुक्त समाज कल्याण

 

पालघर दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाअतंर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षि शाहू महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता http://mahadbtmahait.gov.in हे संकेत स्थळ  सुरु झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीमध्ये आपले शिष्यवृत्ती अर्ज http://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरती भरुन ते ऑनलाईन पध्दतीने आणि ऑफलाईन (हार्ड कॉपी) पध्दतीने आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावेत.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज कार्यालयाकडे सादर करण्यापुर्वी छाननी करुन शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचेच अर्ज कार्यालयास सादर करावेत, आपल्या महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची खरबरदारी घ्यावी. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदर राहणार नाहीत. असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, पालघर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *