Maharashtra

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. गडचिरोलीच्या ११ लाख लोकसंख्येपैकी पावणेसात लाख नागरिकांना यामाध्यमातून मिळालेला लाभ रेकॉर्डब्रेक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात ६ लाख ९७ हजार लाभार्थींची नोंद झाली असून याद्वारे ६०१ कोटींचा लाभ दिला जाईल. गडचिरोलीत सुमारे १७५० मुलींना सरकारने सायकली वाटप केल्या. #सुरजागड कारखान्याच्या माध्यमातून पाच हजार नागरिकांना रोजगार मिळाला आहे. लॉयड स्टीलचा दुसरा उपक्रम लवकरच सुरु करण्यात येईल. हे रोजगार देणारे सरकार आहे.

शासनाच्या वर्षपूर्तीनंतर या अभियानांतर्गत हा पहिलाच कार्यक्रम आहे. आतापर्यंत लोकहिताचे ४०० धोरणात्म निर्णय सरकारने घेतले. पोलिसदलाने गडचिरोलीतील नक्षलवाद जवळपास संपवला आहे. इथले नागरिक निर्भयपणे राहत आहेत. मुख्य प्रवाहातील जिल्हा म्हणून गडचिरोली नावारुपास येत आहे – मुख्यमंत्री

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाचे शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, आरोग्य विभागाचे पीडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे ई -उद्घाटन करण्यात आले. शासन आपल्या दारी अभियानाच्या कॉफी टेबल बुक चे प्रकाशनही करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *