MaharashtraUncategorized

एमपीएससी करिता आता एकच पूर्व परीक्षा

सर्व पदांचा समावेश

एमपीएससी करिता आता एकच पूर्व परीक्षा

राज्य शासनाच्या एमपीएससीमार्फत भरल्या जाणाऱ्या क्लास वन आणि क्लास टू (राजपत्रित) पदासाठी एकच पूर्व परीक्षा तसेच त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही एक पूर्व परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रतापराव दिघावकर यांनी दिली.

पूर्वी एखाद्या नोकरीला असलेल्या उमेदवाराने दुसऱ्या पदासाठी परीक्षा दिल्यानंतर त्याची निवड झाली आणि जर त्याने नोकरीस नकार दिला, तर ते पद रिक्त राहायचे. नंतर त्यासाठी पुन्हा परीक्षा घ्याव्या लागायच्या. आता त्याने लेखी नकार कळवल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला संधी मिळेल.

एमपीएससी परीक्षेत पूर्वी विविध पदांसाठी ५४ पूर्वपरीक्षा असायच्या. आता पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, वनाधिकारी, विक्रीकर अधिकारी अशा कोणत्याही पदासाठी एकच पूर्वपरीक्षा असेल. नंतर कोणत्याही मुख्य परीक्षेला बसता येईल. त्यामुळे त्याला वेगवेगळे अर्ज करावे लागणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *