Politics

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची सदिच्छा भेट घेतली

नवी दिल्ली, २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे  यांची सदिच्छा भेट घेतली.

            मुख्यमंत्री श्री शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील पुस्तक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना भेट दिले.

            यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *