Palghar

महसूल सप्ताहानिमित्ताने पालघर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

 पालघर, दि.31:- महसूल दिन आणि महसूल सप्ताहानिमित्ताने  पालघर (Palghar) जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, उद्या दुपारी तीन वाजता या सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यभर दि. 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  यावर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्यात दि.1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे.  या सप्ताहामध्ये नागरिकांनीही आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवून देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. बोडके (District Collector Palghar)यांनी केले आहे.

महसूल विभागाच्या दि. 25 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सप्ताहात दि. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन शुभारंभ आणि उत्कृष्ट  काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार केला जाणार आहे. दि. 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद उपक्रमात युवकांसाठी दाखले शिबीर, मतदार यादीत नाव नोंदविणे यासारखे उपक्रम होणार आहेत. दि.3 ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा” या उपक्रमात अतिवृष्टीग्रस्त लोकांना नुकसान भरपाई तसेच पुनर्वसन, दुर्गम भागात महसूल अदालत असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. दि.4 ऑगस्ट रोजी “जनसंवाद ” या अंतर्गत सलोखा अभियान यासारखे लोकाभिमुख उपक्रमांची अंलबजावणी होणार आहे. यात जमिनी विषयक नोंदी अद्यावत करण्यात येतील. दि. 5 ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” अंतर्गत सैनिकांच्या कुटुंबांना शासकीय लाभ मिळवून देण्यात येईल.  दि.6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील जिल्हयात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, ‘कर्मचारी संवाद’ या मध्ये गुणवंत पाल्यांचा सत्कार, कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात येईल. महसूल सप्ताह उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी दि.7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत साजरा होईल. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या महसूल सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी  व्हावे व जास्ती जास्त नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले.

हेही वाचा :- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे – डॉ. प्रशांत नारनवरे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *