Pune

शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवा – डॉ. प्रशांत नारनवरे

समाज कल्याण विभागाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीचे समारोप,

पुणे :- समाजातील सामान्य नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक विकास होण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजना सामान्य व राज्यातील शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहचवण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांनी पर्यंत करावे, असे आव्हान समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr Prashant Narnaware)  यांनी येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुला मुलींसाठी निवासी शाळेत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीत केले.

the-governments-plans-to-the-masses-dr-prashant-naranware

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांची राज्यस्तरीय दोन दिवसीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आज या आढावा बैठकीचे समारोप झाले.शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किमान कागदपत्र व शासकीय दरात जात प्रमाणपत्र शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Dr Prashant Narnaware) यांनी आढावा बैठकीत दिले. यासाठी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांची भूमिका अतिशय उपयुक्त व मोलाची असणार आहे.

प्रसंगी उपायुक्त (ना ह सं) कदम पाटील, उपायुक्त (नियोजन) श्री विजयकुमार गायकवाड,
उपसंचालक(शानिशा) श्रीमती बंडगर, उपसंचालक(सांखिकी) श्रीमती रणखांबे, उपायुक्त (लेखापरीक्षण) श्री वीर, सहायक आयुक्त(शिक्षण) श्री आढे, सहायकआयुक्त(निरीक्षण) श्रीमती फुले, सहायकआयुक्त(व्यसनमुक्ती) श्री डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याबाबत योग्य पावले उचलावी. विद्यार्थांच्या जडणघडणीत वसतिगृहांचे महत्त्वाचे स्थान आहे. गृहपाल हे वसतिगृहाचे सर्वेसर्वा असून, त्यांच्या कडून वसतिगृहाची तपासणी करून अडचणी सोडवाव्यात. सोबतच वसतीगृहात संवाद कार्यक्रम राबवुन विद्यार्थ्यां बरोबर चर्चा करण्याचे निर्देश यावेळी डॉ. नारनवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सर्व प्रादेशिक उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.

स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना द्या
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतेही अडचण
होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी समाज कल्याण विभाग
कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अधिकाधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, असे निर्देश यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधितांना दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा द्या
विद्यार्थ्यांना वेळेत वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. वसतिगृहाच्या देखभाल, नूतनीकरण, दुरुस्ती अशा प्रशासकीय अडचणीमुळे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित रहाणार याची खबरदारी घेऊन वसतिगृहाच्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कालबद्ध पद्धतीने नियोजन करावे, ज्या जुन्या इमारती आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या वेळेत दूर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश कसा मिळेल आणि वसतिगृहाची संख्या कशी वाढवता येईल याचे नियोजन करावे, अशा सूचना समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *