पनवेल महापालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल ३७७ जागांसाठी मेगा भरती
गट 'अ' ते गट 'ड' मधील रिक्त असणाऱ्या पदांकरिता सरळसेवा भरती

२ ऑक्टोबर २०१६ रोजी पनवेल महापालिकेची (Panvel Municipal Corporation) स्थापना झाली. पनवेल महापालिकेमध्ये विविध पदांच्या तब्बल ३७७ जागांसाठी मेगा भरती होणार आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार राज्यातील सर्व पालिका प्रशासनामध्ये पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
यानुसार पालिका प्रशासनाकडून पनवेल महापालिकेमधील (Panvel Municipal Corporation) वर्गवारीनुसार रिक्त मंजूर व भरलेल्या पदांचा अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने संवर्ग मध्ये एकूण ३७७ जागांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी महिती पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली असून पदभरतीची जहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थापने नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरती केली जात आहे. पालिका प्रशासनात मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची संख्या वाढली आहे. यामुळे या रिक्त पदांवर तात्काळ पदभरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.
पनवेल पालिकेच्या आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखापरीक्षण सेवा इत्यादी सेवांमधील आहेत. गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील एकूण ३७७ पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी १३ जुलै ते १७ ऑगस्टपर्यंत असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पालिकेच्या संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, अशी सूचना जहिरातीमध्ये करण्यात आली आहे.